स्मार्ट सिटी योजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची आमची त...
स्मार्ट सिटी योजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिकांचे अधिकार कमी करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेमध्ये स्पष्ट केले. स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना फडणवीस यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ कंपनी तयार करण्यात येणार असली, तरी त्यामध्ये कोणाकोणाला घ्यायचे, याचा निर्णय महापालिकांनाच घ्यायचा आहे. त्यामाध्यमातून महापालिकांचे अधिकार काढण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. लोकसहभागातून शहरांचा विकास व्हावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. अनेक लोकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जगात आतापर्यंत जिथे जिथे स्मार्ट सिटी तयार झाल्या आहेत, तेथील सर्वसामान्यांनाच त्यातून फायदा झाला. त्यांचे जीवनमान उंचावले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.