मुंबई : इस्त्रायल आणि लंडनच्या धर्तीवर अत्याधुनिक कमांड ॲन्ड कंट्रोल सिस्टीमच्या सेंटरसह जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनीयुक्त नवीन पोलीस आ...
मुंबई : इस्त्रायल आणि लंडनच्या धर्तीवर अत्याधुनिक कमांड ॲन्ड कंट्रोल सिस्टीमच्या सेंटरसह जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनीयुक्त नवीन पोलीस आयुक्त कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन झाले. जागतिक शहरांच्या श्रृंखलेत प्रमुख असणाऱ्या मुंबई शहराच्या पोलीस दलाला आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त आयुक्तालय अर्पण करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पोलीस दलाच्या कामगिरीत आणखी प्रगती होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा.राम शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित, पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश माथुर, पोलीस आयुक्त अहमद जावेद, सह पोलीस आयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, शहराच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये तर तिसरा टप्पा ऑक्टोबर 2016 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. या यंत्रणेचे कमांड ॲन्ड कंट्रोल सिस्टीम सेंटर या इमारतीमध्ये आहे. हे सेंटर इस्त्रायल आणि लंडनच्या धर्तीवर अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहे. यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे तसेच गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होण्यास मोठी मदत होणार आहे.
सीसीटीएनएसच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणी संगणकीय प्रणालीने एकमेकांना जोडण्यात आली आहे. पोलीस विभागामार्फत नागरिकांना 17 सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. यापुढे पोलीस विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. जेणेकरुन नागरिकांना पोलीस आयुक्त कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. पोलिसांकडे येणारी व्यक्ती शक्यतो पिडीत असते याची जाणीव ठेवून त्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात यावे. यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस सतत कार्यरत असतात. त्यांना चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. पोलीस हाऊसिंग हा शासनाचा महत्त्वाचा अजेंडा असून पोलिसांना सर्व्हिस क्वार्टरबरोबरच कायमस्वरुपी घरे देण्यासाठी शासन आर्थिक पाठबळाबरोबरच सर्वातोपरी प्रयत्न करेल. यासाठी पोलीस गृहनिर्माण मंडळाला विशेष योजना तयार करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या नवीन इमारतीच्या माध्यमातून नागरीकांची कामे जलदगतीने होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश माथुर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी मानले.