Archive Pages Design$type=blogging

राज्याचा क्रीडा नकाशा तयार करणार- विनोद तावडे : शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण

पुणे : राज्याचा क्रीडा नकाशा तयार केला जाऊन कीडा संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल, असे प्रतिपादन...

पुणे : राज्याचा क्रीडा नकाशा तयार केला जाऊन कीडा संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल, असे प्रतिपादन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी येथे केले.

येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात श्री. तावडे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार मेधा कुलकर्णी, शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर, क्रीडा आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे बाळासाहेब लांडगे, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल आदी उपस्थित होते.

श्री.तावडे म्हणाले की, राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू घडत आहेत. त्या त्या भागात एक ठराविक खेळाचा संस्कृती विकसित झाली आहे, आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. पण आता राज्याचा सर्वंकष असा क्रीडा नकाशा तयार केला जाऊन कोणत्या भागात कोणत्या खेळाची संस्कृती आहे, त्यादृष्टीने संबंधित खेळासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, आवश्यक ती मैदाने आणि अनुषंगिक सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

खेळाडूला शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्याला सरावासाठी पुर्ण वेळ दिला जाईल. ज्यावेळी तो खेळण्याचे बंद होईल, त्याचवेळी त्यांच्यावर शासकीय कामकाजाची जबाबदारी सोपवली जाईल, असे श्री. तावडे यांनी सांगितले. तसेच खेळाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झालेल्या खेळाडूंनी क्रीडा खात्यातच सेवा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. क्रीडा पुरस्काराच्या वितरणासाठी यापुढे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गुणवान खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे चमकतील आणि प्रत्येक विद्यार्थी खेळण्यासाठी कशा पद्धतीने उत्सुक असेल, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा धोरणाच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी क्रीडा संकुले उभारण्यात आली पण त्याची देखभाल नीट होत नसल्याने समस्या उपस्थित झाल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे क्रीडा संकुलाच्या उभारणीवेळीच त्याची देखभाल कोणी करायची याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुलाची देखभाल नीट ठेवण्यासाठी निधीत किमान दहा कोटी रुपयांची तरतूद करावी, असे सांगितले. त्याचबरोबर राज्य शासनाचे क्रीडा पुरस्कार वेळेत दिले जावेत. त्यासाठी क्रीडा विभागाने काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

पालकमंत्री गिरीश बापट आणि क्रीडा मंत्री तावडे यांच्याहस्ते मार्गदर्शक, संघटक, खेळाडू यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा आयुक्त राजाराम माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपसचिव अविनाश साबळे, उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांच्यासह क्रीडा विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राज्याचा क्रीडा नकाशा तयार करणार- विनोद तावडे : शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण
राज्याचा क्रीडा नकाशा तयार करणार- विनोद तावडे : शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhajuA70vQkswFMwJ8xPRVvb95Cl4HwzA8OHTbe6R5D-KSF9TG0IyMwWrW2UI-y5F6T4QKs6iKYpo7yzBPG6aKAozLjXEMDqTMDNyy7UQoILLFFPKL0YhQ7ea8B2WawIOi5FmC1pnTT4AUR/s320/TNAIMAGE77730Pune_Tawde_Krida+Puraskar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhajuA70vQkswFMwJ8xPRVvb95Cl4HwzA8OHTbe6R5D-KSF9TG0IyMwWrW2UI-y5F6T4QKs6iKYpo7yzBPG6aKAozLjXEMDqTMDNyy7UQoILLFFPKL0YhQ7ea8B2WawIOi5FmC1pnTT4AUR/s72-c/TNAIMAGE77730Pune_Tawde_Krida+Puraskar.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2015/12/blog-post_30.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2015/12/blog-post_30.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago