श्रीगोंदा दि १७ शहर प्रतिनिधी कुकडी चे आवर्तन सुटून १५ दिवस झाले तरी सुद्धा श्रीगोंदा तालुक्याला एक थेंब हि मिळाला नाही त्यामुळे श्रीगोंदा...
श्रीगोंदा दि १७ शहर प्रतिनिधी कुकडी चे आवर्तन सुटून १५ दिवस झाले तरी सुद्धा श्रीगोंदा तालुक्याला एक थेंब हि मिळाला नाही त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात तातडीने पाणी सोडावे व तालुक्यातील सर्व वितरीकाना दहा दिवस पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी पाटपाणी कृती समितीचे राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृवाखाली कुकडी चे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे या आंदोलनाचे नेतृव पंचायत समिती सद्श राजेंद्र म्हस्के यांनी केले या आंदोलनात एकनाथ आळेकर ,माउली मोटे ,संजय जामदार ,बाबासाहेब इथापे ,प्रशांत दरेकर ,शिंदे गुरुजी ,हरिभाऊ कापसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
*****
तालुक्याचे वाळवंट झाले -म्हस्के
श्रीगोंदा तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी सुद्धा कुकडी चे आवर्तन चालू असताना देखील तालुक्याला पाणी मिळत नाही त्यामुळे तालुक्याचे वाळवंट झाले आहे चालू आवर्तनातून प्रत्येक मुख्य वितरीकेला दहा दिवस पाणी दिले तरच शेतीला पाणी मिळेल जरी दहा दिवस मिळाले नाही तर सात दिवस तरी पाणी द्यावे अशी आपली मागणी आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हस्के यांनी दिली .
*****
तीन दिवस पाणी देवू -कार्यकारी अभियंता कोळी
चालू आवर्तनातून न्यायालयाच्या आदेशाने २०टक्के पाणी कपात झाली आहे तरी सुद्धा तालुक्यातील वितरीकाना तीन दिवस पूर्ण दाबाने पाणी देण्याचा प्रयत्न करू तसेच आवर्तनाचा कालावधी वाढवला आहे का असे आंदोलन कर्त्यांनी कोळी यांना विचारले असता माझ्याकडे अधिकृत आदेश प्राप्त झाला नाही त्यामुळे कालावधी वाढला का नाही हे सांगता येणार नाही असे कोळी म्हणाले .









