मुंबई येथील चैतन्य आधार सोशल फौडेशनच्या वतीने पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बजावल्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श युवा ...
मुंबई येथील चैतन्य आधार सोशल फौडेशनच्या वतीने पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बजावल्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श युवा संपादक पुरस्कार’ दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांना नुकताच जाहीर झाला. फौडेशनचे अध्यक्ष चिन्मय थोरात यांनी ही घोषणा केली असून 31 हजार रुपये रोख, सननचिन्ह व मानपत्र असे स्वरुप असणार्या या पुरस्काराचे फेब्रुवारी महिन्यात मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत वितरण होणार असल्याची माहिती श्री. थोरात यांनी दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या मान्यवरांचा फौडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असून पुरस्कारचे हे चौथे वर्ष असल्याचेही श्री. थोरात यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेता, ग्रामीण वार्ताहर आणि संपादक असा गेली 22 वर्षे श्री. शिर्के यांचा पत्रकारीतेतील प्रवास राहिला आहे. लोकमत, देशदूत या वृत्तपत्रांध्ये उपसंपादक, संपादक म्हणून काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी नगर सह्याद्री हे स्वत:चे दैनिक सुरू केले आहे. सामाजिक, राजकीय विषयांवरील त्यांचे परखड लिखाण आणि त्याद्वारे त्यांना मिळालेला स्वतंत्र वाचक वर्गही आहे. श्री. शिर्के यांना आतापर्यंत राज्य तसेच जिल्हापातळीवरील विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. शिर्के यांचे अभिनंदन होत आहे.










