मुंबई : अंमलबजावाणी संचालनालयाने (ईडी) माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मोठी कारवाई केली असून मुंबईतल्या भुजबळाच्या क...


मुंबई : अंमलबजावाणी संचालनालयाने (ईडी) माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मोठी कारवाई केली असून मुंबईतल्या भुजबळाच्या कंपनीच्या मालकीच्या दोन मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमती सुमारे ११० कोटींच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. भुजबळ आणि त्याचे कुटुंबीय परवेश कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीत संचालक आहेत. याच कंपनीच्या बांद्रा आणि सांताक्रुझमधल्या इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे.









