नगर – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व कुलदिपतात्या कोंडे मित्रमंडळ यांचे वतीने 38 वी कुमार...
नगर – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व कुलदिपतात्या कोंडे मित्रमंडळ यांचे वतीने 38 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2015 -16 दि. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2016 या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, मु. पो. वरवे, ता. भोर, जि. पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
त्या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा कुस्तीसंघ जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, कार्याध्यक्ष पै.शंकरराव घुले, उपाध्यक्ष पै. छबुराव जाधव, उपाध्यक्ष पै. रामभाऊ नळकांडे, सचिव पै. धनंजय जाधव, सहसिचव पै.विलास चव्हाण, खजिनदार पै. नाना डोंगरे, नगर शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे यांनी जाहीर केला. 42 किलो – मुरकुटे ओंकार दिलीप श्रीगोंदा, 46 किलो- अक्षय अंबादास ठोकळ नगर तालुका, 50 किलो – महेश बबन शेळके- नगर विकास , 54 किलो-सुरेश डेंगळे-संगमनेर, 58 किलो-कार्तिक संभाजी रांधवन-कर्जत, 63 किलो – विकास परमेश्वर तोरडमल – कर्जत, 69 किलो – अविनाश ज्ञानदेव मोरे- नगर तालुका, 76 किलो – सागर वसंत कोल्हे- शेवगाव, 76 किलो – भारत तात्यासाहेब म्हस्के – पाथर्डी.
संघ व्यवस्थापक म्हणून पै. नाना डोंगरे व मार्गदर्शक म्हणून हंगेश्वर धायगुडे यांची निवड करण्यात आली आहे.









