नगर जानेवारी 2015 पासून महागाई भत्त्याचा दर 107 टक्क्यावरून 113 टक्के करण्यात आला आहे. परंतु जानेवारी ते सप्टेंबर 2015 अशा नऊ महिन्यातील म...
नगर जानेवारी 2015 पासून महागाई भत्त्याचा दर 107 टक्क्यावरून 113 टक्के करण्यात आला आहे. परंतु जानेवारी ते सप्टेंबर 2015 अशा नऊ महिन्यातील महागाई भत्त्याचा फरक शासनाने त्यावेळी दिला नव्हता. परंतु आता महागाई भत्त्याचा फरक रोखीने देण्याचा निर्णय घेतल्याने, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अनुदानित माध्यमिक विद्यालये, सराव पाठशाळा डी.एड. कॉलेज यांना फेब्रुवारीच्या पगारात 6 टक्के महागाई भत्त्याचा फरक रोखीने मिळणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षकांनाही महागाई भत्त्याचा फरक तातडीने अदा करावा, अशी विनंती शिक्षक भरती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, मोहमंद समी शेख, आश्रम शेख, जिल्हाध्यक्ष सुधीर शेंडगे, ग्रंथपाल संघटनेचे राज्याध्यक्ष विलास गाडगे, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, कार्याध्यक्षा मिनाक्षी सूर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शकुंतला वाळुंज, बेबीनंदा लांडे, जान्हवी नरसाळे, छाया लष्करे, जया गागरे आदि पदाधिका-यांनी माध्यामिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांची भेट घेऊन माध्यमिक शिक्षकांनाही जानेवारी 2015 ते सप्टेंबर 2015 अशा नऊ महिन्यांचा 6 टक्के महागाई भत्त्याचा फरक तातडीने अदा करण्याची विनंती केली असता. त्याची तात्काळ दखल घेत तसे आदेश शिक्षणाधिकारी यांनी निर्गमीत केले आहेत, असेही आप्पासाहेब जगताप यांनी सांगितले.
फेब्रुवारी 2016 च्या वेतन देयकात हा फरक रोखीने काढण्यात येऊन फरक रकान्यात दाखविण्यात यावा व सोबत फरकाचा तक्ता जोडण्यात यावा सदरील फरक आय़कर परीगणनेसाठी ग्राह्य धरून सुधारित परीगणना तक्ता देयकासोबत सादर करावा. फेब्रुवारी महिन्याचे नियमित वेतन देयक 12 फेब्रुवारी पर्यंतच सादर करण्याची दक्षता शाळांनी घ्यावी. कोणत्याही प्रकारे वेतन देयकांस विलंब होणार नाही याची विशेष दक्षता शाळांना घ्यावी, अशी माहिती वेतन पथक अधिक्षक संजय गंभीरे यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण अनुदानीत माध्यमिक शाळा 735 असून त्यामध्ये नॉनप्लॅन मध्ये 714 व प्लॅनमध्ये 21 माध्यमिक शाळा असून यावर 15000 च्या पुढे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करत असून त्यांना याचा लाभ मिळेल.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पॉल भिंगारदिवे, सचिव प्रशांत कुलकर्णी, अशोक धनवडे, सुरेश सरोदे, हनुमंत रायकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, सुदाम दिघे, सिताराम बुचकूल, जान्हवी नरसाळे, मंजुषा घोडके, लता पठारे, कल्पना काळोखे संध्या गावडे, छाया लष्करे जॉन सोनवणे, बापुसाहेब गायकवाड, संदिप कसाब इ. उपस्थित होते.









