नगर- आजच्या युगात मुलगी ही प्रत्येक क्षेत्रात मुलाच्या बरोबरीनेच नाही तर त्यांच्या सरस काम करत आहे. असे प्रतिपादन न्यु आर्टस् कॉमर्स अँण्...
नगर- आजच्या युगात मुलगी ही प्रत्येक क्षेत्रात मुलाच्या बरोबरीनेच नाही तर त्यांच्या सरस काम करत आहे. असे प्रतिपादन न्यु आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले.
या कार्यक्रमासाठी लोक कलाकार व पार्श्वगायक मा.डॉ.गणेश चंदनशिवे प्रमुख उपस्थित होते. समवेत मंचावर माधवराजी मुळे, जी.डी.खानदेशे, अँड. दिपलक्ष्मी म्हसे, रामचंद्रजी दरे, अँड.रामनाथ वाघ, डॉ.रावसाहेब अनभुले, चंद्रकांत म्हस्के, जी.के. पाटील, प्रचार्य डॉ.भास्कर झावरे, उपप्रचार्य, भिसे दिलीप, एम.व्ही.गिते, आर.जे.कोल्हे आदी उपस्थित होते.
झावरे साहेब बोलताना म्हणाले कि आज प्रत्येक गुणवत्ता यादीत पहिल्या पाच मुली आहेत. जर आपला देश महासत्ता करयाचा असेल मुलानी ही प्रगती केली पाहिजे.
कार्यक्रमानंतर लोक कलाकार व पार्श्वगायक यांनी विविध पोवाडे, गोंधळी, भारुड, लावणी संगीत या लोक कलेने विद्यार्थ्यांचे व प्राध्यपकांचे मन जिंकले.यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रचार्य डॉ.भास्कर झावरे यांनी केले. तर महाराष्ट्र गीत हे संगीत विभागाने सादर केले. व सुत्रसंचालन प्रा.उद्धव उगले व प्रा.राजेंद्र जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन भंडारे सरांनी केले.









