पुणे : राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सध्याच्या व्यवस्थांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. ते बदल करण्यासाठी राज्य शासनाचे प्रय...
![]() | ||
| पुणे : राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सध्याच्या व्यवस्थांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. ते बदल करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘स्टेट फायनान्सेस इन महाराष्ट्र’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यशदा येथे झालेली ही कार्यशाळा राज्य शासनाचा वित्त विभाग, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आणि मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव (व्यय) सीताराम कुंटे, यशदाचे महासंचालक आनंद लिमये आदी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, उत्पन्न वाढविण्याबरोबरच खर्च कमी करणे याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी प्रचलित व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर करचुकवेगिरी कशी कमी करावी. उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवावे, करप्रणाली सुटसुटीत कशा पद्धतीने करावी, याचा विचार केला जात आहे. देशातील नागरिकांची बचत करण्याची वृत्ती आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक संकट आले तरी आपली अर्थव्यवस्था अडचणीत आली नाही, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, महसुली खर्च नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान राज्य शासनासमोर आहे. घेतलेल्या कर्जातून भांडवली गुंतवणूक कशी होईल, याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. श्री. श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रोहयो व जलसंधारणचे सचिव प्रभाकर देशमुख, नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी आणि वित्त आणि लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. | ||










