नगर (प्रतिनिधी,)- विविध आंदोलने व चर्चासत्रे तसेच भाषणांच्या निमित्ताने टीव्हीवर नेहमी दिसणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रत्यक...
मुलांमध्ये बालपणापासून चांगले संस्कार रुजावेत तसेच ग्रामीण जीवनातील विकास कामांचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहावे यासाठी एल अँड टीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, मानव संसाधन विभाग प्रमुख नागेशचंद्र आढाव, युनियन प्रतिनिधी उमेश शिंदे, पदाधिकारी किरण देशमुख, बाबूराव काळे, बाळासाहेब चहाळ आदींच्या पुढाकाराने एल अँड टी परिवारातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या मुला-मुलींना राळेगण सिद्धी येथे नेण्यात आले होते. तेथे लोकसहभागातून झालेल्या ग्रामविकासाची माहिती या मुलांनी घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी मुलांना भरभरून आशीर्वाद देताना समाजासाठी कार्यरत राहण्याचा संदेश दिला. सामाजिक बांधिलकीचे महत्त्व, नैतिकता, शुद्ध चारित्र्य, एकमेकांना मदतीची भावना आदींबाबत विविध उदाहरणांसह त्यांनी साधलेला संवाद मुलांना मंत्रमुग्ध करवून गेला. टेक्नोसॅव्ही मुलांनी यानिमित्ताने अण्णांसमवेत सेल्फीचाही आनंद घेतला. एचआर अधिकारी संजय टेणी व शेफाली भट्टाचार्यजी यांनी या मुलांच्या राळेगण भेटीचे नियोजन केले होते.









