नगर – एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्यावतीने दर वर्षी ध्येयवादी कामगार कार्यकर्त्यास दिला जाणारा साथी किशोर पवार कार्यकर्ता पुरस्कार ...
नगर – एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्यावतीने दर वर्षी ध्येयवादी कामगार कार्यकर्त्यास दिला जाणारा साथी किशोर पवार कार्यकर्ता पुरस्कार लालनिशाण (लेनिनवादी) पक्षाचे कार्यकर्ते कॉ. अनंतराव लोखंडे यांना जाहीर झाला आहे.
साथी किशोर पवार हे बेचाळीसच्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, साखर कामगारांचे नेते, समाजावादी चळवळीचे आधारस्तंभ आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष होते. कॉ.अनंतराव लोखंडे यांचे कामगार क्षेत्रातील आणि जातीअंताच्या चळवळीतील संघर्षपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डाव्या आणि त्याचबरोबर शाहु, फुले, आंबेडकरी चळवळीत कॉ. अनंत लोखंडे सातत्याने सक्रीय योगदान देत आहे. फाऊंडेशनचे सचिव सुभाष वारे, सिटूचे नेते कॉ.अजित अभ्यंकर, लोककल्याण मजदूर युनियनचे अँड.राम शरमाळे, आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणा-या अँड. सुरेखा दळवी, यांचे उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल याच कार्यक्रमात कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल या विषयावर परिसंवाद होईल. पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. 30 जानेवारी 2016 रोजी सायं. 5.30 वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह, प्रोफेसर कॉलनी चौक, अहमदनगर येथे होईल, अशी माहीती मधु पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.









