अहमदनगर - जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनिचौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना नाकारलेल्या परावनगीच्या पार्श्वभूमीवर, भूमाता...
अहमदनगर - जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनिचौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना नाकारलेल्या परावनगीच्या पार्श्वभूमीवर, भूमाता संघटनेच्या सभासद महिला शनि चौथ-यावर जाऊन दर्शन होणार हे माध्यमातून प्रसिद्ध झाले होते.
त्याप्रमाणे भूमाता संघटनेकडून हेलिकॅप्टरने येऊन चौथ-यावर उतरण्याचा इरादा प्रशासकीय परवानगीच्या मुद्द्यावरून रद्द करण्यात आला. आज दि. 26 रोजी दुपारी पुण्याहून निघालेल्या भूमातांना सुपा येथे हॉटेल कुणालाजवळ मोठ्या पोलिस फौजफाट्यानिशी अडवण्यात आले. संघटनेकडील 7 बस व 15 कार ताब्यात घेण्यात आल्या.
दरम्यान, आम्हाला आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे होते मात्र पोलिसांनी आम्हाला अडवून प्रकरणाला हिंसक वळण दिले. अशी संघटनेच्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. संघटनेच्या काही सभासद महिलांनी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने समजते. अखेर रस्त्यावरच ठाण मांडून देसाई यांनी टाळ वाजवीत आंदोलनाला सुरुवात केली.











