Archive Pages Design$type=blogging

दरेवाडी प्रताप हेल्थ क्लबचा प्रदीप पोपळघट ‘अ.नगरश्री’ चा मानकरी

नगर- अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असो.च्या मान्यतेने व नेवासा तालुका बॉडी बिल्डिंग असो. यशवंत हेल्थ क्लबच्यावतीने 26 जानेवारी रोजी ने...

नगर- अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असो.च्या मान्यतेने व नेवासा तालुका बॉडी बिल्डिंग असो. यशवंत हेल्थ क्लबच्यावतीने 26 जानेवारी रोजी नेवासा येथे झालेल्या 42 व्या ‘अहमदनगर श्री’ चा मानकरी; दरेवाडी, ता.नगर येथील प्रताप हेल्थ क्लबचा प्रदीप पोपळघट हा मानकरी ठरला. अ.नगर जिल्ह्यातील 200 स्पर्धकांवर मात करीत, अतिशय उत्साही वातावरणात प्रेक्षकांची वाहऽ वा मिळवत त्याने हा किताब पटकाविला. त्याला रोख 5 हजार रुपये, मानाचा चषक, किता व बेल्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ‘मा.आमदार श्री’चा किताब राहुरी येथील ‘सखाहरी बर्डे’ याने पटकाविला त्याला रोख 3 हजार रुपये, मानाचा किताब, चषकासह बेल्ट देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड, राष्ट्रीय पंच प्राचार्य जयंत गिते, मयुर दरंदले, कैलास रणसिंग, सतीश रासकर, कन्हैय्या गिलशेर, नितीन पारखे यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून जेम्स ससाणे, राहुल कुलकर्णी, शब्बीर अन्सार सय्यद यांनी काम पाहिले.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड यांनी प्रताप हेल्थ क्लबचे संचालक, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमभाऊ भोगाडे, सोहेल शेख यांची नंदूरबार येथे 7फेब्रुवारी होणार्‍या ‘उत्तर महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी कोच व संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जयंत गिते व अशोक बेरड यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
55 किलो वजन गट (अनुक्रमे) :1) सखाहरी बर्डे, राहुरी 2) आकाश भोसले, कोपरगांव 3) मोईन तांबोळी 4) नवनाथ कुर्‍हे, कोपरगांव 5) रितेश चव्हाण, अ.नगर. 60 किलो :1) बिलाल तांबोळी, कोपरगांव 2) सद्दाम शेख,नगर 3) बाळू बर्डे, राहुरी 4) तरबेज शेख, राहुरी 5) मयुर भिंगारे, नगर. 65 किलो :1) राजा उईके, श्रीरामपूर 2) श्रेयश शिंदे, नगर 3) विजय गायकवाड,नगर 4) अनिल बर्डे,राहुरी 5) अर्जुन लटपेट,नगर. 70 किलो :1) प्रदीप पोपळघट, नगर 2)सुरेश सरोदे, राहुरी, 3) लखन बर्डे,राहुरी 4) बबलू गुलदगड,राहुरी 5) असीम इनामदार, राहुरी. 75 किलो :1) विशाल दळवी, मयुर कदम 3) सागर येवल,राहुरी 4) शालीक सौंदाळे, श्रीरामपुर 5) मित वडागळे,नगर. 75 किलोवरील :1) निखिल बनसोडे,शिर्डी 2) जार्सिेंफ पठाण 3) संतोष गायकवाड, श्रीरामपूर 4) शेख इम्रान,नगर 5) शेख जावेद, श्रीरामपूर.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: दरेवाडी प्रताप हेल्थ क्लबचा प्रदीप पोपळघट ‘अ.नगरश्री’ चा मानकरी
दरेवाडी प्रताप हेल्थ क्लबचा प्रदीप पोपळघट ‘अ.नगरश्री’ चा मानकरी
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/01/blog-post_48.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/01/blog-post_48.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago