अमृतसर (वृत्तसंस्था)- संशयास्पद हालचाली असणाऱ्या शस्त्रधारी युवकाला रेल्वे पोलिसांनी आज (बुधवार) अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल...
अमृतसर (वृत्तसंस्था)- संशयास्पद हालचाली असणाऱ्या शस्त्रधारी युवकाला रेल्वे पोलिसांनी आज (बुधवार) अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनजवळ एका युवकाची संशयास्पद हालचाल जाणवली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे देशी पिस्तूल व काडतुसे आढळून आली. मध्य प्रदेशातून तो जम्मू-काश्मीरकडे निघाला होता. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पठाणकोटमधील हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.









