नगर - 27 व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त शहरातील आनंद विद्यालय, समर्थ विद्यालय, मेहेर इंग्लिश स्कूल, रेणावीरकर विद्यालय व श्रीराम वि...
नगर - 27 व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त शहरातील आनंद विद्यालय, समर्थ विद्यालय, मेहेर इंग्लिश स्कूल, रेणावीरकर विद्यालय व श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांचे चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणा-या विद्यार्थ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गिते व आरटीओ अधिका-यांच्या हस्ते सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर वाघमारे म्हणाले या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश विषद करतांना मुलांमध्ये जागृती निर्माण करणे हा हेतू आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जाणीव निर्माण करणे, जागरुकता निर्माण करमे, माहिती देणे, आरोग्य, वर्तणूक बदलण्यासाठी हा कार्यक्रम होता. अपघाताचे प्रमाण वाढले. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, मानसिक हानी होते.
दरवर्षी 3 लाख लोकांना अपघातात अपंगत्व येते. 85 हजार माणसे दरवर्षी देशात मृत्यू पावलात यामध्ये 15 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण जास्त आहे. आई-वडिल मुलांना घडवत असतात पण बेफिकीरीे ही मुले वाहन चालवून अपघातात मृत्यू पावतात. यासाठी अपघात घडणार नाही, असे वाहन चालविले पाहिजे. कायदे नियम आपल्यासाठीच आहे. मग आपण ते पाळत का नाही? शरीराच्या अवयवाची काळजी घेतली पाहिजे, अपघातात माणूस मृत्यू पावल्यास त्याच्या घरातील लोकांचे काय? ज्याच्यावर घराची जबाबदारी असते, याचाही विचार करावा.
अध्यक्षीय समारोपात राजाराम गिते मार्गदर्शन करतांना म्हणाले, रस्ता सुरक्षेची व्याप्ती मोठी आहे. प्रिय व्यक्ती काल होती पण आज नाही. जोराची हार्टअॅटक व मोठा अपघात या दोन गोष्टींमुळे माणूस राहत नाही. स्वतःपुरते तरी जगले पाहिजे. बक्षीसपात्र विद्यार्थी हे रस्ता सुरक्षेचे दूत आहेत असे ते म्हणाले हेल्मेट व सिटबेल्ट मृत्यूच्या दाढेतून काढणारे आहेत. त्यासाठी त्याचा वापर जरूर करावा. जास्त अंतर रात्रीचा प्रवास व जोरात वाहने चालवू नये असे गिते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता कुलकर्णी हिने केले तर आभार शिवज्योती भामरे हिने मालने. यावेळी आरटीओ अधिकारी रुपदास, दुरगोडे, वडितके, दळवी, मगर, पिंगळे, शेख देशमुख, यांच्यासह कर्मचारी गणोरकर, माळी, रामेश्वर बुंदेले, नागापुरे बेंडे, देहरे, शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धामधून 25 विद्यार्थ्य बक्षिसपात्र निवडण्यात आले होते.









