Archive Pages Design$type=blogging

जिल्ह्यात यंदा २६४ गावांत जलयुक्त शिवार

नगर (प्रतिनिधी) - जलयुक्त शिवार योजनेतील गावांच्या निवडीवर आमदारांनी बैठकीत आक्षेप घेतल्यानंतर आता या योजनेसाठी २६४ गावांची यादी ...


जिल्ह्यात यंदा २६४ गावांत जलयुक्त शिवार
नगर (प्रतिनिधी) - जलयुक्त शिवार योजनेतील गावांच्या निवडीवर आमदारांनी बैठकीत आक्षेप घेतल्यानंतर आता या योजनेसाठी २६४ गावांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यात संगमनेर, पाथर्डी, जामखेड, पारनेर या दुष्काळी तालुक्यातून जास्त गावे निवडण्यात आली असून, २६ जानेवारीला जलयुक्तच्या कामाला लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पथदर्शी जलयुक्त शिवार अभियानात गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत प्रशासनाने निवडलेल्या २६४ गावांवर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. त्यात काही दुरुस्त्याही सूचविल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने तालुकानिहाय निवडलेल्या गावांची यादी जाहीर करण्याचे टाळले होते. त्यानंतर आता २६४ गावांची यादी निश्चित केली आहे. त्यात पाथर्डी तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे, संगमनेरमधील ३५, जामखेडमधील ३५ गावांची निवड करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील वीस गावांची निवड झाली आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील एकाच गावाची निवड करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस पडणारा अकोले तालुक्यातही १७ गावांची निवड झाली आहे. सातत्याने पाण्याचे टँकर सुरू असलेले, नरेगांतर्गत मजूर उपलब्ध होणारे, कमी पाऊस पडणारे, अतिउपसा होणारे असे निकष निश्चित करून गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. बंधारे, गाळ उपसा इत्यादी कामे केली जाणार आहेत. निधीची कमतरता भासू नये म्हणून दहा लाख रुपयांची कामे रोजगार हमी योजनेतून केली जाणार आहेत. रोजगार हमीतून कामे करणाऱ्या गावांमध्ये जास्तीत जास्त कामे करण्यास मंजुरी दिली जाणार आहे. तसेच लोकसहभाग असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या गावांसाठी कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले जाणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून या योजनेतून कामाला सुरुवात होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामांचे उद्घाटन केले जाणार आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: जिल्ह्यात यंदा २६४ गावांत जलयुक्त शिवार
जिल्ह्यात यंदा २६४ गावांत जलयुक्त शिवार
http://maharashtratimes.indiatimes.com/thumb/msid-50659411,width-300,resizemode-4/maharashtra/ahmednagar/jalyuktnagar/-/jalyukt-shivar-project-to-cover-5000-maharashtra-villages-in-first-phase.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/01/blog-post_77.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/01/blog-post_77.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago