लखनऊ,( प्रतिनिधी ) दि. ८ - उत्तरप्रदेशातील जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी समाजवादी पक्षाने भाजपला पंतप्रधान न...
जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने एकहाती बाजी मारली आहे. ७४ पैकी एकूण ६० जागांवर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पश्चिम उत्तरप्रदेशात फक्त पाच जागांवर भाजपला विजय मिळवता आला.
वाराणसीमध्ये जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अपराजिता सोनकर यांनी भाजप उमेदवार अमित सोनकर यांचा १३ मतांनी पराभव केला. अपराजिता यांना ३० तर, अमित यांना १७ मत मिळाली.










