सन 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परिक्षेमध्ये कै.वि.ल.कुलकर्णी प्राथ.शाळेचा निकाल 100% लागला. एलिमेंटरी परीक्षेस एकुण 19 व...

सन 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परिक्षेमध्ये कै.वि.ल.कुलकर्णी प्राथ.शाळेचा निकाल 100% लागला. एलिमेंटरी परीक्षेस एकुण 19 विद्यार्थी बसले होते. त्यात B श्रेणीमध्ये कु.गौरी अभंग, संस्कृती भारताल, गाजुल श्रध्दा व चि.मुनगेल वैभव हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 15 विद्यार्थी C श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. त्यांना मुख्याध्यापिका सौ.धिमते व कलाशिक्षिका सौ.म्हस्के अनामिका पो.यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दि.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री वाल्मिक कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री.द.पु.पाटिल, सेक्रेटरी अॅड.श्री.अ.ना.मुळे, खजिनदार अॅड.सौ.स्वाती नगरकर तसेच रुणवाल सर ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य श्री.दि.ना.जोशी व श्रीमती रेखे मॅडम यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.









