नगर - रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणालातरी जीवन दान देतो. यांचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकाने वर्षातून एकद...
नगर - रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणालातरी जीवन दान देतो. यांचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकाने वर्षातून एकदा करावे. रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते. युवकांनी रक्तदान चळवळीत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी सहभाग घेतला. यावेळी 200 महिलांची हिमोग्लोबीन आणि मधुमेह तपासणी करण्यात आली. अष्टविनायक ब्लड बँकेचे जितेंद्र पलिकुंडवार, अमोल सरोदे, वरलक्ष्मी श्रीपद, स्नेहल पठारे, वृषाली मोरे, श्रृतीका निगुर, नलीनी मुसळे, प्रभाकर वाघ, उषा ओहळ आदिंनी तपासणीचे काम पाहिले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.











