अहमदनगर - दि. 6-2-2016 - जनता माध्य. व उच्च माध्य. विद्यालय रुईछत्तीसी ता.नगरया विद्यालयातील इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांचा एच.एस.सी. बोर...
अहमदनगर - दि. 6-2-2016 - जनता माध्य. व उच्च माध्य. विद्यालय रुईछत्तीसी ता.नगरया विद्यालयातील इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांचा एच.एस.सी. बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छापर निरोप समारंभ आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक रुईछत्तीसी येथील मा.पठाण साहेबप उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सेंट्रल बँक रुईछत्तीशी येथील मा.पठाण साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल व शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या प्रतिभा व स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी शाळेला रोख 1100/- रु. भेट दिली.
याप्रसंगी पठाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना भावी काळात स्पर्धा परीक्षेत यशस्वी कसे व्हावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य ना.कर्वे बी.बी.सर यांनी परीक्षेला तणावमुक्त व कॉपीमुक्त कसे सामोरे जावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना भावी काळात याच जनता शिक्षण संकुलात विविध शाखेतील दर्जेदार शिक्षण मिळेल या भावना विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मिळेल या भावना विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दत्ता पा.नारळे यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षक श्री गोरे आर.आर. ज्येष्ठ शिक्षक शेलार सर, लांडगे सर, साठे सर, साबळे सर, मुळे सर, लांडगे मॅडम, कोतकर सर, म्हस्के सर, महारनवर सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
प्राध्यापिका सौ.पवार यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.










