अहमदनगर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त अभिवादन कऱण्यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या...
अहमदनगर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त अभिवादन कऱण्यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील 125 नवोदित लेखक कवींच्या कवितांचा समावेश असणारा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिध्द करण्यात येणार असून त्यासाठी डॉ.आंबेडकरांच्या विचारावर आधारित कविता पाठवाव्यात असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी नवोदित कवींनी आपल्या दोन रचना, परिचय, फोटो, पोस्टची रु.5 ची 5 तिकिटे 20 फेब्रुवारी 2016 पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावे़डी, अहमदनगर - 414003 मो.क्र. 9371812989 येथे पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.










