भिंगार - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत शिरोमणी रोहिदासजी महाराज यांची संयुक्त जयंती उत्सव भिंगार ...
भिंगार - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत शिरोमणी रोहिदासजी महाराज यांची संयुक्त जयंती उत्सव भिंगार शहरात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समितीचे अध्यक्ष शेख जाकीर हुसैन होते.
अध्यक्षीय भाषणात शेख जाकीर हुसैन यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. मुस्लिम समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे जेणेकरुन समाजामध्ये जातीवाद नष्ट होईल. प्रमुख पाहुणे म्हणुन स्वामी विवेकानंद प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोदजी मुळे, शिवसेना कॅन्टोमेंट बोर्ड सदस्य रविंद्र बुंदेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार यांनी सांगितले की, गेल्या
12 वर्षापासून प्रतिष्ठान नस्वार्थपणे समाजाची सेवा करीत आहे. या वर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भिंगार शहरात प्रथमच सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा मानस प्रतिष्ठानतर्फे आयोजित करणार आहे असे जाहीर केले आहे.