सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व सहकार्याने केरळ सायकलिंग असोसिएशन 20 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आय...
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व सहकार्याने केरळ सायकलिंग असोसिएशन 20 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 24 ते 27 फेब्रुवारी 2016 दरम्यान निलक्का- लाहा, केरळ येथे करीत आहे.
सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार या स्पर्धेमध्ये भाग घेणारा महाराष्ट्राचा संघ निवड करण्यासाठी राष्ट्रीय पदक विजेते आंतरराष्ट्रीय सायकलपटू राजेंद्र सोनी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पदक विजेते सायकलपटू मिलींद झोडगे, सौ.दिपाली पाटील तसेच वाशिम जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे प्रा.धनंजय वानखेडे व अहमदनगरचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.संजय साठे यांची समिती गठीत करण्यात आली आहे. संजय साठे या समितीचे निमंत्रक आहेत. या समितीच्या मार्गदर्शनानुसार व साईनाथ बहुउद्देशीय क्रीडा संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2016 रोजी अहमदनगर येथे सर्व वयोगटातील सायकलपटूंचा राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व वयोगटासाठी होणाऱ्या या निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्हा संघटनांनी आपल्या जिल्ह्याच्या सायकलपटूंची नांवे गुरुवार दिनांक 11 फेब्रुवारी 2016 पर्यंत प्रा.संजय साठे यांच्याकडे समक्ष किंवा cficommitteeformaharashtra@gmail.com या मेलवर पाठवावीत.
अशी माहिती सीएफआय़ नियुक्त निवड समितीचे समन्वयक संजय साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.










