अहमदगनर - येथील जिल्हा शिक्षक बँक संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभुमीवर 25 ते 29 जानेवारी या क...
अहमदगनर - येथील जिल्हा शिक्षक बँक संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभुमीवर 25 ते 29 जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल केले गेले. त्यानुसार 682 अर्ज दाखल झाले. त्यात राखीव जागांसाठी 283 आणि सर्वसाधारण जागांसाठी 399 अर्जांचे छाननी झाली. त्यामध्ये ज्ञानेश्वर वाकचौरे (सदिच्छा-कोपरगाव), प्रमोद घोडके (ऐक्य-श्रीगोंदा), संतोष खामकर (गुरुमाऊली-पारनेर), आण्णासाहेब आंधळे (अपक्ष-पाथर्डी), अशा इल्हे (गुरुमाऊली-कोपरगांव) प्रदीप कांबळे (ऐक्य-जामखेड) अशा सात उमेदवारांचे अर्ज नाव घेऊन 675 अर्ज मंजूर करण्यात आले.
दि. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अर्ज मागे घेण्याचा कालावधी मोठा असल्याने मनधऱणी, तडजोड यांना मोठा वाव मिळणार आहे. मोठ्या मंडळांमध्ये चर्चा होत असल्या तरी स्वतंत्रपणे तडजोडीस कोणी नसल्याचे दिसत नाही. त्यात मंडळांचीही सहा-सात जागांची मागणी होत असल्याने, मोठ्या मंडळांची अस्वस्थता वाढली आहे.
निवडणुकीसाठी सर्व तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 14 जागा, महापालिका, पालिका, भिंगार कॅन्टोनमेंट व गौण टिचिंग प्रवर्गातून 2, अनुसुचित जाती जमाती 1, महिला प्रतिनिधी 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातून 1 अशा या 21 जागा आहेत. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर म्हणजे 16 फेब्रुवारीला अंतिम चित्र स्पष्ट होणार नाही.










