अह्मदनगर महानगर पालिकेने सन 2015-16 या डायरीचे वाटप, सर्व नगरसेवक अधिकारी यांना तसेच शहरातील महत्वाचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांची म...
अह्मदनगर महानगर पालिकेने सन 2015-16 या डायरीचे वाटप, सर्व नगरसेवक अधिकारी यांना तसेच शहरातील महत्वाचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांची मोबाईल नंबर, फोन नंबर व घर ठिकाणच्या पत्यासह माहिती आहे. परंतु ही डायरी पाहत असतांना त्यामध्ये सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फोटो आहेत.
सर्व नगर सेवक, महापौर लोकशाही मार्गाने निवडून येतात व महानगर पालिकेत सर्व अधिकारी लोकशाही पध्दतीने घटनेला धरुन बसविले जातात. मग ज्या घटनेप्रमाणे ही महानगरपालिका चालते, आपल्या देशाने जी लोकशाही स्विकारली, त्या लोकशाहीची राज्यघटना लिहणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा या डायरीत फोटो नाही. ह्या महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत सहभागी करुन घेतांना मनसे आठवली, मग डायरी छापताना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा फोटो कसा विसरला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो डायरीत छापायला अधिकारी पदाधिकाऱ्यांना काटे टोचतात का? ह्या छापलेल्या डायरीचा मनसे जाहिर निषेध करत असून ही बाब मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणुन देऊन नवीन डायऱ्या छापण्याची मागणी मनसे करणार आहे. असे मनसेचे शहर युवा नेते नितीन भुतारे यांनी विधीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.










