Archive Pages Design$type=blogging

रेल्वे बजेट 2016-17 प्रभूंची किमया

गेल्या वर्षभरामध्ये रेल्वेला उद्देशून अनेक इच्छा-आकांक्षा सातत्याने व्यक्त होत आल्या. देशाच्या अर्थसंकल्पावरती प्रभाव टाकणाऱ्या रेल्...



गेल्या वर्षभरामध्ये रेल्वेला उद्देशून अनेक इच्छा-आकांक्षा सातत्याने व्यक्त होत आल्या. देशाच्या अर्थसंकल्पावरती प्रभाव टाकणाऱ्या रेल्वे अर्थ संकल्पाकडे संपूर्ण देशवासीयांचे यामुळेच लक्ष्य लागून होते. 

आज दुपारी 12 वाजता संसदेच्या सभागृहामध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे आगमन होताच उपस्थित सदस्यांचा अपेक्षाही उंचावल्या. आपला पेटारा उघडताच 'हम ना झुकेंगे, हम ना रुकेंगे' असे म्हणत प्रभू्ंनी आपला अर्थसंकल्प मांडण्यास सुरवात केली. तत्पुर्वी अर्थसंकल्प मांडतांना सभागृहाची शांतता कायम राहिल का? याविषयीही देशवासीयांच्या मनात उत्सुकता होती. 

अर्थसंकल्पामध्ये आगामी वर्षामध्ये रेल्वे नक्की काय करणार? हे सांगतांना प्रभूंनी आश्वासनांचा मोठा डोंगर उभा केला. त्याप्रमाणे - * रेल्वे अर्थसंकल्प फक्त अपेक्षांचं प्रतिक आहे. व्यवहारांचं गणित नाही सर्वांनी मिळून नवनिर्मितीची गरज आहे. मंदीचा काळ असतांना देखील रेल्वेला नफ्यात आणण्याचा आपला प्रय़त्न आहे. केवळ भाडेवाढच नाही तर उत्पन्नाचे नवे स्त्रोत आणण्याचेही प्रय़त्न असतील. * मालवाहतूक दारात कपात करुन प्रवासी दरातला तोटा कमी करण्याचा प्रयत्न * आगामी काळात रेल्वेतील गुंतवणूक दुप्पट * कामाची पध्दत बदलून विकासाचा प्रय़त्न * यंदाच्या अर्थसंकल्पात किमान 8720 कोटी रु.ची बचत * मानवरहित फाटक इतिहासजमा करणार * वेळेवर गाडी सोडणे आणि सर्वांना रिझर्वेशन हे उद्दीष्ट 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रय़त्न * समस्या सोडविण्याचे पारंपारिक मार्ग बंद करणार * गरज असेल तिथेच आरक्षण देणार *

गाड्यांचा वेग ताशी 80 किमी करण्याचा प्रय़त्न * पुढील वर्षी 2500 कि.मी. नवे मार्ग सुरु करणार * रेल्वे गाडीतील मलमूत्र विसर्जन थांबवणार * सध्या रोज 13 कि.मी. मार्ग तयार केले जातात ते आता 19 कि.मी.करणार * किमान 1 लाख 21 कोटी गुंतवणूकीचे लक्ष्य असेल * बिहारसह पूर्वेकडील राज्यातील लोकांना रोजगार देणार * पुढील दोन वर्षात रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण करण्यावर भर * कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मिडियाचा वापर * श्रीनगरला रेल्वे मार्गाला जोडण्याचे काम लवकर पूर्ण करणार * मार्च अखेर प्रत्येक स्टेशनवर व रेल्वेत बायोटॉयलेट उपलब्ध कऱणार * रेल्वे तक्रारी संदर्भात फोन लाईन्सची उपलब्धता * मेक इन इंडिया अतंर्गत रेल्वेचे 2 कारखाने उभारणार * जनरल बोगीत मोबाईल चार्जरची सुविधा * येत्या 2 वर्षात 400 स्टेशनवर वायफाय सुविधा * ई-तिकिट मिनिटांत 2000 ऐवजी 7000 करणार * अपंगांसाठी व्हील चेअरचे ऑनलाईन बुकींग * 400 स्टेशन्सचा पी.पी.पी. अंतर्गत विकास कऱणार * रेल्वे स्टेशनवर 2500 व्हेडिंग मशिन लावणार * बडोदरा येथे रेल्वे विश्वविद्यालयाची स्थापना * महिला व वृध्दांसाठी लोअर बर्थमध्ये विशेष कोटा * महिलांसाठी 24 तास सक्षम हेल्पलाईन सुविधा * सामान्य माणसांसाठी आरक्षण नसलेल्या गाड्या चालवणार * ज्येष्ठ प्रवाशांसाठी 50% आरक्षण * लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये खान-पान सह मनोरंजन सुविधा * सामान्य प्रवाशांसाठी 10 मार्गांवर अनरक्षित अंत्योदय एक्सप्रेस चालविणार * प्लॅटफॉर्म वरील अपघात रोखण्यासाठी विशेष मॉ़डेल * सर्व स्टेशनवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरा * उदय या डबल डेकर ए.सी. ट्रेनचा वेग ताशी 130 कि.मी. करणार * लांब पल्ल्यांच्या गाडीत अनरक्षित दिनदयाल कोचेसची उपलब्धता * मुलांसाठी बेबी फुड, दुध, गरम पाणी स्टेशनवर उपलब्ध कऱणार तसेच डायपर चेंज करण्यासाठी टेबल उपलब्ध करुन देणार * सर्व मोठ्या स्थानकावर स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणार * रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवण्याची सोय * अंत्योदय, तेजस, हमसफर आणि उदय या चार विशेष सुविधाजनक गाड्यांची घोषणा * चर्चगेट-विरार, सी.एस.टी.-पनवेल, एलिव्हेटेड कॅरीडोअरला प्राधान्य * मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कामास प्रारंभ * मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणार त्याचसोबत कार्य़ालयांच्या वेळा बदलण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणे * ए.टी.व्ही.एन. मध्ये पैशांसह डेबीट व क्रेडीट कार्डची सोय * मुंबईतील सर्व प्लॅटफ़ॉर्मची उंची वाढविणे * दिल्ली 21 स्टेशनवर रिंग रेल्वे सुरु करणार * कुलीला यापुढे सहाय्यक असे संबोधणार तसेच त्यांचा ड्रेसकोडही बदलणार * रेल्वेला महसूल मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती कऱणार. देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडतांना आपल्याला 124 खासदारांनी त्यांचा निधी रेल्वेच्या विकासासाठी दिला हे सांगण्यासही प्रभू विसरले नाही. तसेच सबका साथ, सबका विकास ही आमची फक्त घोषणा नाही तर तो आमचा विचार आहे असेही सभागृहाला उद्देशून प्रभू म्हणाले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: रेल्वे बजेट 2016-17 प्रभूंची किमया
रेल्वे बजेट 2016-17 प्रभूंची किमया
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdZltuGQSVxsKbnNFg9el-cMZp00rh4FjH3nc0Nn11RGqfy-Sb38jFS7PsuE_FEqXXd1YeGO4WLgmb9Fo2-2Kq3v3xWNVeMfGsfreU5HXYvIqnXJHYU17bRTGRK7pQndJZTLpfMTvGmGdN/s320/suresh-prabhu.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdZltuGQSVxsKbnNFg9el-cMZp00rh4FjH3nc0Nn11RGqfy-Sb38jFS7PsuE_FEqXXd1YeGO4WLgmb9Fo2-2Kq3v3xWNVeMfGsfreU5HXYvIqnXJHYU17bRTGRK7pQndJZTLpfMTvGmGdN/s72-c/suresh-prabhu.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/2016-17.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/2016-17.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago