नगर - हिंदु हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व आदरनीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब (केंद्रीय ग्रामविकास मंत्री, भारत सरकार), य...
आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसाहेब यांच्या विचार सरणीला अनुसरुन काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हरिहरेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.चेमटे श्रीकांत यांनी रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ करुन दिलेला आहे. गेले 7 वर्षापासून महिन्याच्या 7 तारखेला व 19 तारखेला मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर राबवून 10280 (दहा हजार दोनशे ऐशी) रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले व करीत आहेत. अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति, संस्था यांना आपले प्रस्ताव दि. 5 मार्च पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या व्यक्ति, संस्था यांनी आपला अल्पपरिचय चार पासपोर्ट, रंगीत साईज फोटो, दोन मान्यवर व्यक्तींचे शिफारस पत्र असे आवाहन पत्रकान्वये यांनी केले आहे.










