नगर:- नॅशनल युवा को-ऑप सोसायटी व गॅस ऑथरटी र्ऑें इंडिया यांच्यावतीने देशभरातून जपानमधील टोकीओ ऑलंपिक 2020 साठी धावपट्ूंची निवड चाच...
नगर:- नॅशनल युवा को-ऑप सोसायटी व गॅस ऑथरटी र्ऑें इंडिया यांच्यावतीने देशभरातून जपानमधील टोकीओ ऑलंपिक 2020 साठी धावपट्ूंची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येत असून, नगर जिल्ह्याची निवड चाचणी येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आली. यामध्ये 1483 धावपटूंनी सहभाग घेतला. त्यातील 40 धावपटूंची राज्यस्तरांवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा समन्वयक सुरेश खामकर यांनी दिली.
या स्पर्धेस जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धा 100, 200 व 800 मिटरमध्ये घेण्यात आली. 100 मी. साठी 13.05 सेकंद, 200 मी साठी 27.00 सेकंद, 800 मीटर 2 मिनिट 14 सेकंद अंतर निर्धारित करण्यात आले होते. जिल्ह्यातील 100 व 200 मीटरसाठी निर्धारित उद्दीष्ट 40 धावपटूंनी पूर्ण केले. 800 मीटरला धावपटू धावले, परंतु 2 ते 3 सेकंदाने 6 ते 7 खेळाडू मागे पडले. त्यामुळे 800 मीटरला नगर जिल्ह्यातील एकही खेळाडूंची निवड झाली नाही.
स्पर्धा संपल्यानंतर निवड झालेल्या 40 स्पर्धकांचा सत्कार नॅशनल युवा को-ऑप सोसायटीचे महाराष्ट्र-कर्नाटक राज्य समन्वयक मंगेश बेंडखळे व अ.नगर जिल्हा समन्वयक सुरेश खामकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
निवड झालेले खेळाडू पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवर राज्यस्तरीय स्पर्धेकरीता जाणार आहेत. त्यातील निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाणार असून, त्यात निवड झालेले धावपटू 2020 साली जपानमधील टोकीओ ऑलंपिक स्पर्धेसाठीे पात्र ठरतील. दरम्यानच्या चार वर्षात या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच यासाठी आवश्यक तो सर्व खर्च संबंधीत संस्था करणार आहेत.









