नगर - बुऱ्हाणनगर पाणीयोजनेमुळे नागरदेवळे परिसराचा विकास होऊ शकला. वीजबिल थकल्यामुळे बुऱ्हाणनगर पाणीयोजना बंद करण्यात आली. आपण ही योजना आ...
नगर - बुऱ्हाणनगर पाणीयोजनेमुळे नागरदेवळे परिसराचा विकास होऊ शकला. वीजबिल थकल्यामुळे बुऱ्हाणनगर पाणीयोजना बंद करण्यात आली. आपण ही योजना आजपासून पूर्ववत सुरु केली. ही योजना कायम सुरु राहण्यासाठी पाणीपट्टी भरणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी. अधिकाऱ्यांनीही पाणीयोजनांद्वारे नागरिकांना मीटर बसवून पाणी द्यावे. त्यामुळे पाण्याची व विजेची बचत होईल, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. नागरदेवळे येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रय़त्नातून सुमारे 2.25 कोटी रुपये खर्चून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ.कर्डिले बोलत होते. याप्रसंगी पं.स.उपसभापती शरद झोडगे, जि.प.सदस्य बाजीराव गवारे, सरपंच राम पानमळकर, उपसरपंच सुवर्णा जाधव, श्याम घोलप, संदीप कर्डिले, रोहित भुजबळ, सुनीता कचरे, गटविकास अधिकारी रेश्मा होजगे, अनिल करांडे, हनुमंत लव्हाट, शकुंतला सुतार, संजय सपकाळ, सत्तार शेख, राहुल गोंधळे, अलका पानमळकर, अजय गारदे, चेतना बग्गन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










