नगर - अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, इमारत बांधकाम संघटना, रिक्षा पंचायत, सुरक्षा रक्षक कामगार संघटना आदि कामगारांचा मेळावा सोमवार दि.22 ...

नगर - अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, इमारत बांधकाम संघटना, रिक्षा पंचायत, सुरक्षा रक्षक कामगार संघटना आदि कामगारांचा मेळावा सोमवार दि.22 फेब्रुवारी 2016 रोजी दु.1 वा.जिल्हा हमाल पंचायत कार्यालय, मार्केट यार्ड, नगर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांनी दिले.
या मेळाव्यास आ.शिवाजीराव कर्डिले, आ.अरुण जगताप, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.स्नेहलता कोल्हे, आ.मोनिका राजळे आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात खाजगी सुरक्षा रक्षकांना मंडळ लागू झाले असून त्यातील सुरक्षा रक्षकांना मंडळ नोंदणीबाबत माहिती देणे, रिक्षा पंचायतीच्या विविध मागण्या, इमारत बांधकाम संघटनेचे प्रश्न आदिंबाबत या मेळाव्यात चर्चा करुन या कष्टकऱ्यांना पेन्शन व आरोग्य विम्या योजनेंबाबत शासनास्तरावरील प्रयत्नासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.









