नगर - मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत कवी हिम्मत अमिर अहेमदनगरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवा...
नगर - मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत कवी हिम्मत अमिर अहेमदनगरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवार दि. 4 फेब्रु.2016 रोजी 9 वा. रहेमत सुलतान हॉल, एस.टी.कॉलनी रोड, सर्जेपुरा, अहमदनगर येथे महेफिले मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष अबीद आबीद दुलेखान यांनी दिली.
या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी चाँद सुलताना हायस्कूलचे माजी प्राचार्य सय्यद सैफ अली असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील इतिहासकार डॉ.अस्लम मिर्झा, मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे अब्दुस सर, चॉंद सुलताना हायस्कूलचे सचिव हाजी शौकतभाई तांबोळी, प्रेस क्लबचे प्र.अध्यक्ष मन्सूरभाई, इकरा सोसा.चे सचिव इंजि.इकबाल सय्यद, उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलिमखान पठाण, उपाध्यक्ष के.के.खान, संचालक इंजि.अनिस शेख आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मुशायऱ्यामध्ये कमर अजाज (औरंगाबाद), इर्शाद अंजुम (मालेगांव), अनिस बोस्तानी (मालेगांव), अंकिल अहेमद अकिल (भिवंडी), डॉ.कमर सुरुर, गनी मोहंमद गनी, प्रो.नवेद बिजापुरे, मोहंमद अली सैफी, बिलाल अहेमदनगरी समन्वयक मुनव्वर हुसेन छोटे खान यांनी सांगितले.
या मुशायऱ्यास उर्दू भाषिक व गजल रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अमिरखान छोटेखान यांनी केले आहे.










