नगर - नगर तालुक्यातील पांगरमल येथील पांगरमल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची 50 वर्षानंतर प्रथमच निवडणूक झाली 2016-2021 करिता सोसायट...
नगर - नगर तालुक्यातील पांगरमल येथील पांगरमल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची 50 वर्षानंतर प्रथमच निवडणूक झाली 2016-2021 करिता सोसायटी विकास पॅनल व भैरवनाथ परिवर्तन विकास पॅनल यांच्यामध्ये लढत झाली. भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष व पांगरमलचे माजी सरपंच भिमराज आव्हाड व बापुसाहेब आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ पॅनलचे 2 महिला व 1 मागासवर्गीय असे 3 बिनविरोध निवडून आले तर उर्वरित 9 उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.ठोंबरे यांनी काम पाहिले.
शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 8 ते 4 मतदान झाले. यामध्ये 324 मतदार होते. यापैकी 293 मतदारांनी आपला हक्क बजावला. शुक्रवारीच 4 ते 5 मतमोजणी होवून निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.ठोंबरे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये भैरवनाथ परिवर्तन विकास पॅनलचे बिनविरोध झालेल्या उमेदवारामध्ये 2 महिला आहेत. श्रीमती सुगंधाबाई रामभाऊ आव्हाड, सौ.सविता भारत आव्हाड, आणि मागास वर्गीयात श्री.पिराजी भिमाजी वाकडे हे बिनविरोध निवडून गेले होते. निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार व पडलेली मते पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण मतदार संघात बबन मारुती आव्हाड (180), बबन बन्सी आव्हाड (173), अशोक ज्ञानदेव आव्हाड (163), रावसाहेब ज्ञानदेव आव्हाड (161), गोरक्षनाथ ज्ञानदेव आव्हा़ड (151), इंदर नामदेव आव्हाड (146), भाऊसाहेब जगन्नाथ आंधळे (142), भटक्या विमुक्त जाती जमाती मधून आदिनाथ महादेव आव्हाड (169) तर इतर मागास वर्गीय जागा रिक्त आहे.









