रविवार दि. 21/02/2016 रोजी महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनची बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व साखर...

रविवार दि. 21/02/2016 रोजी महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनची बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व साखर, विडी, एस.टी.वीज महामंडळ, शेती महामंडळ व गिरणी कामगार संघटनेचे 45 प्रतिनिधी बैठकीसाठी हजर होते. मा.ना.कोशियारी समितीच्या अहवालातील शिफारसी-1) कमीत कमी 3,000/- 2) पेन्शनचा महागाई भत्त्याशी संबंध 3) दर तीन वर्षांनी पेन्शनबाबत आढावा वगैरे इतर मागण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर दि.25 ते 29 एप्रिल 2016 या कालावधीमध्ये धऱणे धरण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संपुर्ण देशातील इ.पी.एस.95 अंतर्गत येणारे असंख्य कामगार या धरणे धरण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत, महाराष्ट्रातील 10,000/- पेन्शन धारक या कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत.
तसेच बुधवारी दि. 6 एप्रिल 2016 रोजी बुलढाणा येथे महाराष्ट्रातील इ.पी.एस. 95 अंतर्गत पेन्शन धारकांचा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या धरणे धरण्याच्या कामाचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी वरील कामास अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पेन्शन धारक, एस.टी.निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आव्हान रमेश गवळी सचिव, अर्जुन बकरे अध्यक्ष यांनी केले आहे.









