दर रविवार भंडारदरा सहल नगर - येथील एस. टी. महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे प्रत्येक रविवारी भंडारदरा सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे....
दर रविवार भंडारदरा सहल
नगर - येथील एस. टी. महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे प्रत्येक रविवारी भंडारदरा सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता पहिली सहल माळीवाडा बस स्थानकातून निघेल अशी माहिती विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी दिली आहे. दुपारी १२ वा. बस भंडारद-याला पोहचेल व चार वाजता परत परतीच्या प्रवासाला निघेल प्रवासात अगस्ती आश्रय पहाण्यास बस थांबणार आहे.
या सहलीसाठी 499 रु. भाडे नियोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र 250 रुपये असा सवलतीच्या दर ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक 2416610, मार्केटींग अधिकारी श्रीराम देशमुख मो. 9422738803 यांचेशी संपर्क साधता येईल.
प्लॅस्टिक बाटलीतील दारू बंद
मुंबई - प्लॅस्टिक बाटलीतील दारु विक्री ही कर्करोगाला आमंत्रण देणारी असल्याचा दावा ग्लोबल एनव्हिरो सोल्यूशन्स या स्वयंसेवी संस्थेने केला होता. त्याचप्रमाणे दारु प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये ठेवल्याने त्यातील विषारी रसायनांची पातळी वाढते असा निष्कर्ष नॅशनल टेस्ट हाऊस या सरकारी प्रयोगशाळेनेही वाढला होता.
सरकारी ग्लोबल संस्थेच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार प्लॅस्टिक बाटलीतील दारु विक्रीला ११ जानेवारी रोजी शासन निर्णय (जी.आर.) जारी करून बंदी घालण्यात आल्याचे शासनाच्या वतीने खंडपीठास कळविण्यात आले. खंडपीठाने याचिककर्त्यांना हा निर्णय कळून याचिका निकाली काढली आहे.
चौथर-यावर स्त्रियांना बंदी, समर्थन करणार? अनिसचा सवाल
नगर - भारतीय संविधानानुसार जात-धर्म-पंथ-लिंग आणि जन्माचे ठिकाण या आधारावर भेटलेला जाणार नाही. असे असतांना शनी देवाच्या चौथ-यावर युवती गेली म्हणून शनी मूर्ती दुधाने धुवून पवित्र केली. या निषेधार्थ अनिसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर धर्मदाय आयुक्तांनी अनिसच्या अॅड. निर्मला चौधरी यांच्या पत्रकाद्वारे उत्तर दिले.
त्यानुसार रुढी व परंपरेमुळे स्त्रियांना प्रवेश बंद आहे. सध्या स्त्री-पुरुष अशा दोघांनाही बंदी आहे. दुधाच्या अभिषेक गावक-यांच्या सांगण्यावरून नेला असे म्हटले आहे.
यावर रुढी व परंपरा आपणास मान्य आहेत का? तसेच स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश नाकारता. या कृतीचे आपण समर्थन करता का? असा थेट प्रश्न अनिस ने धर्मदाय आयुक्तांना विचारला आहे. तसेच 11 हजार दिल्यानंतर पुरुषांना प्रवेश मिळतो, असे असता सर्वांनाच प्रवेश बंदी आहे, असे खोटे का सांगितले जाते? असेही विचारले आहे. विश्वस्तांना या संबंधी जाब विचारल्या का? दुधाचा अभिषेक करणा-यांवर कारवाई का केली नाही? असेही प्रश्न विचारले आहेत.
दरम्यान स्त्रियांना शनी चौथ-यावर प्रवेश मिळाला या मागणीचे पतीत पावन संघटनेचे समर्थन केले आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करून महिलांची मागणी मान्य व्हावी अशी मागणी संघटनेचे शहराध्यक्ष सचिव धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय कर्मचा-यांना अपघात विमा
मुंबई- वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना अपघाती विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातात शासकीय कर्मचारी व अधिका-यांचे होणारे मृत्यू व येणारे कायद्याचे अंपगत्व या विषयास अनुसरून आल्प विमा दर आकारून त्यांना विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. ही योजना 1 एप्रिलपासून अंमलता येणार आहे. अपघातात मृत्यू, कायमचे अपंगत्व, विकलांगता अन्याय 100 टक्के लाभ मिळणार आहे. समूह अपघात विमा योजना आणि राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 या स्वतंत्र असणार आहेत.










