श्रीरामपूर - तालुक्यातील खोकर-भोकर येथे वीस मिनिटात तीन जणांवर बिबट्याने हल्ला करुन त्यांस गंभीर जखमी केले आहे. सुबाबाई विठ्ठल कुसळकर (वय...
श्रीरामपूर - तालुक्यातील खोकर-भोकर येथे वीस मिनिटात तीन जणांवर बिबट्याने हल्ला करुन त्यांस गंभीर जखमी केले आहे. सुबाबाई विठ्ठल कुसळकर (वय 60), अशोक दगडू पाटोळे (वय 45), चैताली गणेश बेरड अशी जखमींची नावे आहेत. हा प्रकार मंगळवारी सकाळी 6 वा. घडला.
सुबाबाईची सुटका भटक्या कुत्र्यांनी केली. अशोक पाटोळे व चैताली बेरड यांची गावकऱ्यांनी सुटका केली. वनविभागाने या भागात तातडीने पिंजरा लावला आहे. बिबट्या सकाळच्या वेळी माणसांवर हल्ला करीत नाही. हल्ला करणारी गाभण मादी असावी. केवळ उपासमारीने तिने हल्ला केला असावा असे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जखमी तिघांनाही नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.










