नगर - टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल येथे दि.16 फेब्रुवारी 2016 रोजी सुदृढ बालक स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या ...
नगर - टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल येथे दि.16 फेब्रुवारी 2016 रोजी सुदृढ बालक स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिक्षक दिलीप गुंजाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ.सुचित तांबोळी होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ.भाऊसाहेब खिलारी, डॉ.तुषार धुमाळ व डॉ.प्रदिप दाते यांनी केले. यावेळी केंद्र प्रमुख श्री तरटे, मधुकरराव मुळे संस्थेचे अध्यक्षा श्रीमती सत्यभामा काकडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल आय़ोजित सुदृढ बालक स्पर्धेप्रसंगी मार्गदर्शक करतांना बालरोग तज्ञ डॉ.सुचित तांबोळी, समवेत आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिक्षक दिलीप गुंजाळ, डॉ.भाऊसाहेब खिलारी, डॉ.तुषार धुमाळ व डॉ.प्रदीप दाते, केंद्र प्रमुख श्री.तरटे, मधुकरराव मुळे संस्थेचे अध्यक्षा श्रीमती सत्यभामा काकडे, श्रीराम देशमुख, प्रदीप काकडे, श्री.वाघचौरे आदी. (छाया-संजय गुंजाळ)









