श्रीरामपूर - श्रीरामपूर-कोपरगाव हा संयुक्त विधानसभा मतदार संघ, पुनर्रचनेत तयार करण्यात आला होता. हा मतदार संघ त्यावेळी पाच वर्षांसाठी राख...
श्रीरामपूर - श्रीरामपूर-कोपरगाव हा संयुक्त विधानसभा मतदार संघ, पुनर्रचनेत तयार करण्यात आला होता. हा मतदार संघ त्यावेळी पाच वर्षांसाठी राखीव करण्यात आल्याने 1962 साली काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले बाबुराव सावळेराम चतुर्भुज हे वामनराव दामोधर वाकचौरे यांचा पराभव करुन श्रीरामपूरचे पहिले आमदार म्हणून निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
काल बुधवार दि.10 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी सकाळी 9 वाजता त्यांचे वृ्ध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे मूळ गाव पुणतांबा आहे. याठिकणी त्यांनी
शेती केली. याच ठिकाणी ते तलाठी म्हणूनही सेवेत होते. गणेश सह साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. आमदारकीनंतर श्रीरामपूरमध्ये ते व्यावसायिक म्हणून स्थायिक झाले होते. 1990 च्या दरम्यान ते जिल्हा फेडरेशनचेही संचालक होते.
सजविलेल्या रथातून काल रात्री त्यांची अंत्ययात्रा दशमेश नगरच्या चौकातील त्यांच्या नि्वासस्थानापासून काढण्यात आली होती.










