नगर - समाजातील कट्टरवाद कमी होण्यास व नवीन पिढ्यांवर सर्वधर्मसमभावाचे संस्कार होण्यासाठी महान पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी सामाजिक उपक्रमा...

नगर - समाजातील कट्टरवाद कमी होण्यास व नवीन पिढ्यांवर सर्वधर्मसमभावाचे संस्कार होण्यासाठी महान पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाद्वारे राबवून त्यांच्या विचारांचा प्रसार करणे अपेक्षित आहे. आजच्या या सामाजिक उपक्रमांसारखे कार्य़क्रम झाल्यास पोलीसांवरील ताण कमी होईल, असे प्रतिपादन अहमदनगरचे अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी केले.
मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघ, राजुभाई मित्र मंडळ व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ यांनी आयोजित केलेल्या शिवचरित्र चित्रकला जगप्रसिध्द छायाचित्रकार ठाकुरदास परदेशी यांचे किल्लाचे छायाचित्र प्रदर्शन व प्रख्यात नाणी संग्राहक सचीन डागा यांचे दुर्मिळ नाण्यांचा खजिन्यांचे प्रदर्शन शिवजयंतीनिमित्त आदर्श शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंकज देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास तज्ज्ञ डॉ.निरज साळुंखे, इंजि.अनिस शेख उपस्थित होते.









