नगर - स्वरांकित संगीत विद्यालय, अहमदनगर प्रस्तूत गीतबहार हा मराठी सुमधूर गीतांचा सुरेल कार्यक्रम रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी माऊली सं...
नगर - स्वरांकित संगीत विद्यालय, अहमदनगर प्रस्तूत गीतबहार हा मराठी सुमधूर गीतांचा सुरेल कार्यक्रम रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी माऊली संकूल, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर येथे सायं. 5 वा. आयोजित केलेला असून सदर कार्यक्रमामध्ये पार्श्वगायक संतोष कुलट व चित्रपट पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे गायन होणार आहे. तसेच पंडित राजू जावळकर यांचे स्वतंत्र तबलावादन होणार आहे. या कार्यक्रमाला गीतांची आवड असणा-या सर्वांना आमंत्रित करण्यात आलेले असून असा हा मराठी गीतांचा अविस्मरणिय कार्यक्रम निश्चितच सर्वांच्या पसंतीला उतरेल.
सदर कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक ऋषीकेश कुलट यांनी दिली.










