Archive Pages Design$type=blogging

पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या वतीने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन

नगर - महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दि.25 ते 27 मार्च 2016 दरम्यान मिनी थिएटर, रविंद्र नाट्य मंदिर, ...



नगर - महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दि.25 ते 27 मार्च 2016 दरम्यान मिनी थिएटर, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिली.
जगभरात अनेक दशके कला, संस्कृती, ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक समस्या, जाणिवा, लोकांचे प्रश्न, जागतिक घडामोडी सारखे असंख्य विषय मनोरंजनात्मक पध्दतीने चित्रपट व लघुपटाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडले जात आहे. अशाच विविध विषयांना डोळ्यासमोर ठेवून सृजनात्मक पध्दतीने आणि कलात्मक लघुपटांची निर्मिती करणाऱ्या लघुपटकरांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिनेमॅटिक व्हिजन एंटरटेनमेन्ट ही संस्था या महोत्सवाचे संयोजन करण्यात आले आहे. सिनेमॅटिक व्हिजन एंटरटेनमेन्ट ही संस्था या महोत्सवाचे संयोजन करणार आहे.
तीन दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवात निवडक लघुपटाच्या प्रदर्शनासोबतच विविध कार्य़शाळा, चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांच्या गट चर्चा, मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे यासारख्या कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. व्यावसायिक आणि नवोदित यांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या या महोत्सवासाठी विनामुल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
सामाजिक जनजागृती, काल्पनिक आणि आंतरराष्ट्रीय अशा तीन गटात वर्गवारी या लघुपट महोत्सवासाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या महोत्सवासाठी विनामुल्य प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2016 ही आहे. तर डी.व्ही.डी. सादर करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे.
विजेत्यांना रोख रकमेसह सुवर्ण, रौप्य, कास्य पदके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. महोत्सवासाठी सर्वांना विनामुल्य प्रवेश असेल पण त्यासाठी या महोत्सवाच्या वेबसाईटवर जाऊन आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवासाठी सर्वांना विनामुल्य प्रवेश असेल पण त्यासाठी या महोत्सवाच्या वेबसाईटवर जाऊन आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवासंदर्भात अधिक माहितीसाठी 9768930853, 9967393007, 9029622163 या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच (http://maharashtrainternationalshortfilmfestival.com) या वेबसाईटवर संपर्क साधावा. फेसबुकवर सुध्दा तुम्ही महोत्सवाच्या पेजला भेट देवु शकता असे अकादमीने आवाहन केले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या वतीने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन
पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या वतीने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjUnnXpRkLLfkg0QpI3vhtjXFBxHBBL0EHCVQHFocIVJv9lqI4Xe0I8KGahdOYeVtbvXnwO6E830EJ2F8DkN647pmnOR7XJb5q_XhabWNg4l9WCcCZQkNYBuCa8-C5nKa-W8N5XyGzcVNVc/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjUnnXpRkLLfkg0QpI3vhtjXFBxHBBL0EHCVQHFocIVJv9lqI4Xe0I8KGahdOYeVtbvXnwO6E830EJ2F8DkN647pmnOR7XJb5q_XhabWNg4l9WCcCZQkNYBuCa8-C5nKa-W8N5XyGzcVNVc/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_129.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_129.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago