अहमदनगर कृषी विभागाच्या वतीने उप.विभागीय अहमदनगर स्तरावर 12 कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मा.विभागीय कृषी सह संच...
अहमदनगर कृषी विभागाच्या वतीने उप.विभागीय अहमदनगर स्तरावर 12 कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मा.विभागीय कृषी सह संचालक, पुणे विभाग पुणे, विजय कुमार इंगळे यांचे हस्ते स्मृतिचिन्हा, शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन सनान्मित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब नितनवरे, रामदार दरेकर, किरण मोरे आदिसह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
नगर तालुक्यांतील श्री बाळासाहेब काकडे, आशुतोष ढुमणे, श्रीमती सुविधा वाणी, संजय येरगुंटला, श्रीमती सुषमा तरवडे, पाथर्डी तालुक्यांतील नमारायण करांडे, गोरक्षनाथ पठारे, वसंत भोईटे, नारायण शिनगारे, पारनेर तालुक्यांतील अमृत गांगर्डे, संदिप गायकवाड, आशिष दिवटे यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उन्न्तीसाठी विविध योजना राबविले जात असून त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचविणेसाठी आमचा कर्मचारी वर्ग हा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून त्याचीच एक पावती म्हणून आज 12 कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले आहे.
उप विभागीय कृषि अधिकारी अहमदनगर यांनी सांगितले की, प्रत्येक कृषि कर्मचाऱ्यांचे कामाचे मूल्यमापन करुन पुरस्कार देणेत आले असून ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांनी हान न मानता चांगले काम करुन दाखवून पुरस्कारांसाठी प्राप्त व्हावे. सदर पुरस्कार हा पुणे विभागामार्फत चालू करणेत आला असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. मुकत्याच पुणे येथे झालेल्या कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचा क्रीडा स्पर्धेतही नगर विभागात 4 कर्मचाऱ्यांना पारितोषिक व स्मृतिचिन्ह देवून गौरवणेत आले आहे हि कौतुकाची बाब आहे.










