नगर- सालाबाद प्रमाणे श्रीराम चौकात श्री संत वामनभाऊ यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रघुनाथ औटी यांचे हस्ते प्रतिमेस प...
नगर- सालाबाद प्रमाणे श्रीराम चौकात श्री संत वामनभाऊ यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रघुनाथ औटी यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ह.भ.प. मदुकर राऊत यांनी वामनभाऊंच्या चरित्र जीवनावर व्याख्यान दिले.
श्रीराम चौक तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पांडुरंग जाधव, गोरक्षनाथ पालवे, तुकाराम पालवे, जाधव सर,पठारे,पिंपळे, खंडेलवाल, कदम, शिंदे, गायकवाड, औटी, गीते आदि उपस्थित होते. पुण्यतिथीनंतर प्रसादाचा लाभ सर्व समाज बांधंवांनी घेतला.










