अहमदनगर - स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा केला होता. त्यामुळेच स्वराज्यामध्ये ...
अहमदनगर - स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा केला होता. त्यामुळेच स्वराज्यामध्ये कधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नाहीत. शासनानेही महाराजांची अर्थव्यवस्था तपासून पाहण्याची गरज आहे. महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम केल्यास निश्चीतच महाराष्ट्रतील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील असे प्रतिपादन सहा.साखर आय़ुक्त शरद जरे यांनी केले.
मराठा सेवा संघ, मराठा पतसंस्था, संभाजी ब्रिगेड, तानुबाई कक्ष व मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षाचे वतीने शिवजयंतीनिमित्त मार्केटयार्ड अहमदनगर येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे केंद्रिय कार्य़कारिणी सदस्य सोपानराव मुळे, विठ्ठलराव गुंजाळ, सहकार कक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कराळे, कार्य़ाध्यक्ष इंजि. बप्पासाहेब बोडखे, विभागीय सहसचिव संपतराव साठे, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सोनाळे, जिल्हाधिकार्य़कारिणी सदस्य प्रा.पोपटराव काळे, इंजि.बबनराव खिलारी, डॉ.ज्ञानेश्वर गांगर्डे, राजेंद्र म्हस्के, संभाजी ब्रिगेड, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, गोरख दळवी, गणेश गायकवाड, दत्ता साठे, तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल लहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न् झाला.










