अहमदगनर (प्रतिनिधी)- बेघरांच्या प्रश्नावर चालू असलेल्या मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने रविवार दि. 14 रोजी नगर तालुक्यातील अर...
अहमदगनर (प्रतिनिधी)- बेघरांच्या प्रश्नावर चालू असलेल्या मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने रविवार दि. 14 रोजी नगर तालुक्यातील अरणागव येथील रेडक्रॉस सोसायटीच्या सरकारी पडिक जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याच्या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांगर ओढून सत्याग्रह केला.
रे़डक्रॉस सोसायटीचे मैदान शहर व उपनगारतील आंदोलकांच्या वतीने व्यापून गेले होते. महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी तिरंगा ध्वज हातात घेऊन संचलनाने परिसराची पाहणी केली. आंदोलनात रेडक्रॉस सोसाटीच्या 59 नंबरच्या 8 हेक्टर 89 आर या 25 एकर जमीनीवरील 5 एकर कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी 19 एकर बेघरांच्या घरकुलासाठी तर 1 एकर स्मशानभुमीसाठी नियोजित करण्यात आले.
या आंदोलनात अॅड. कारभारी अॅड. गवळी, अशोक सब्बन, सौ.नर्मदा गायकवाड, अॅड.लक्ष्मण पोकळे, अॅड. संजय जव्हेरी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक शिंदे, बाब दळवी, शिवाजी बोरकर, शांताराम भोगाडे, साधू बेग, डॉ.भांडारकर विठ्ठल सुरम, नाना दोंदे, संतोष लोंढे, विजय हजारे, सखुबाई बोरगे, अशोक भोसले, मोहंमद शेख आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहर व उपनगरातील बेघरांच्या वतीने जमा करण्याची मान्यता मिळाली असल्याचे माहिती अॅड.पोकळे यांनी दिली.










