Archive Pages Design$type=blogging

गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त दिंडी

नगर -नगरच्या गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थापक कै.वै.पं. गंगाधरशास्त्री गुणे यांच्या 68 व्या पुण्यतिथीनिमित्त आयुर्वेद महाविद्यालय...



नगर -नगरच्या गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थापक कै.वै.पं. गंगाधरशास्त्री गुणे यांच्या 68 व्या पुण्यतिथीनिमित्त आयुर्वेद महाविद्यालयामधील त्यांच्या समाधीस आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, सभागृहनेता कुमार वाकळे, महिला बालकल्याण सभापती नसिम शेख, उपसभापती कलावती शेळके, स्थायी समिती सभापती गणेश भोसले, नगरसेवक कैलास गिरवले आदिंनी समाधीस अभिवादन केले.

गंगाधर गुणे शास्त्रीं यांनी स्थापन केलेल्या या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचा 2017 साली शतक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या मार्गदर्शक आयुर्वेद ग्रंथांची ग्रंथ दिंडी काढून अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना महाविद्यालयाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. 

गुणेशास्त्रींच्या जय जयकारात वाजत गाजत निघालेली ही ग्रंथ दिंडी ग्रामदेवत श्री विशाल गणेश मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा आयुर्वेद महाविद्यालयात आली. विशाल गणपती मंदिरात ट्रस्टींच्यावतीने दिंडीचे स्वागत करुन मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात दिंडीतील वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेले गोल रिंगण रंगले. यावेळी आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे सचिव डॉ.विजय भंडारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ.संगीता निंबाळकर, संचालक अरविंद शिंदे, ज्ञानेश्वर रासकर, वैशाली ससे, डॉ.समीर होळकर, डॉ.ए.टी.देशमुख, डॉ.सुरज ठाकूर, डॉ.गणेश मगर, डॉ. प्रभाकर पवार, डॉ.किरण जावळे, डॉ.उत्क्रांती सलगरे, डॉ.नितीन जाधव, डॉ.प्रमिला नलगे, डॉ.पौर्णिमा जगताप, डॉ.दत्तात्रय लोडे चंद्रकांत औशिकर, कार्यालयीन व्यवस्थापिका प्रतिभा भारदे आदिंसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी वैद्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त दिंडी
गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त दिंडी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVSJMjfM2EZCnWL9mOifCBMCLWDvn6OYPZniGU09u-3UJmW6BK3B10k4vA9KDZqvZzBBDD-dOBNiu2ZyBK1zNpyBUmLN0XFWT8OGdQGtIgrd-P4DGKmCk3kR7L2jX4-UK-Oe2iuMHuTqdt/s320/2008.JPG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVSJMjfM2EZCnWL9mOifCBMCLWDvn6OYPZniGU09u-3UJmW6BK3B10k4vA9KDZqvZzBBDD-dOBNiu2ZyBK1zNpyBUmLN0XFWT8OGdQGtIgrd-P4DGKmCk3kR7L2jX4-UK-Oe2iuMHuTqdt/s72-c/2008.JPG
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_153.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_153.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago