अ.नगर - सिध्दार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथ.शाळेत दि.11 फेब्रुवारी 2016 रोजी स्मृतींना उजाळा कार्य़क्रम घेण्यात आला. दि.11 फेब्रु...
अ.नगर - सिध्दार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथ.शाळेत दि.11 फेब्रुवारी 2016 रोजी स्मृतींना उजाळा कार्य़क्रम घेण्यात आला.
दि.11 फेब्रुवारी 1936 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थेस सदिच्छा भेट दिली होती व शाळेविषयी संस्थेविषयी गौरवोद्गार काढून शेरा शेरेबुकात नोंदवला होता. तो आजही संस्थेच्या दफ्तरी आहे. तो यानिमित्ताने विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मा.माधव वाघ (सह.आयुक्त समाज कल्याण) मा.अशोकराव गायकवाड, आरोळे साहेब, सुनिल क्षेत्रे, मा.वसंतराव म्हस्के, भागिरथी गायकवाड, ज्योती मोकळ, बबनराव सोनवणे, प्रा.रत्ना वाघमारे, संध्या मेढे, सुमेध गायकवाड, प्राचार्य क्षेत्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक प्रा.जयंत गायकवाड म्हणाले, आम्ही व आमचे विद्यार्थी भाग्यवान आहोत कारण एवढ्या महान व्यक्तीचे चरण आ्मच्या या भुमिला लागले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलप्रसाद तिवारी यांनी केले. तर आभार उंडे सर यांनी मानले कार्य़क्रम यशस्वी करण्यासाठी उकर्डे सर, साबळे सर, गोसावी मॅडम, वांगणे मॅडम, शिरसाठ मॅडम यांनी प्रयत्न केले.










