नगर - महाराष्ट्र शासनाने आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती यांचे सर्वांगिण उन्नतीकरीता सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागातर्फे यशवंतराव...
नगर - महाराष्ट्र शासनाने आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती यांचे सर्वांगिण उन्नतीकरीता सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागातर्फे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येणार असल्याची प्रसिध्दी मा.जिल्हाधिकारी अनिल कवडे साहेब, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त माधवजी वाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जाहीर करुन सुमारे20 कुटुंबाचे पूनर्वसन करण्याच प्रसिध्द केलेले आहे. अशा अवस्थेत मानवता जन आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक चळवळीच्या वतीने नगर जिल्ह्यातील तळागाळातील भूमीहिन व बेघर लोकांना शासकीय जमीन अथवा वन जमिनीमधून प्रत्येकी 2 गुंठे जागा रहिवासी प्रयोजनासाठी मिळावी याकरीता मा.जिल्हाधिकारी महसुल विभाग यांच्याकडे तसेच मा.मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय याठिकाणी 392 लोकांचे प्रस्ताव दाखल केले असून मा.मुख्यमंत्री कार्यालयाने सदरचे प्रकरण कक्षाधिकारी महसूल व वनविभाग यांच्याकडे पाठविल्याचे मानवता जन आंदोलनास शासनाने कळविले आहे. सदरचे प्रस्ताव हे जर महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना बसविल्यास नगर जिल्ह्यातील हजारो बेघरांचा प्रश्न सुटणार आहे. या मागणीबाबत मानवताजन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची बैठक वडगाव गुप्ता याठिकाणी जन आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अॅड.महेश शिंदे यांचे अध्यक्षतेखाली होऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडण्यात यावा तसेच शासनाने 392 बेघर लोकांचे प्रस्ताव यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत घ्यावी अशी मागणी मानवता जन आंदोलनाच्या वतीने वरील सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी व विचार विनिमय करण्यासाठी दि.13 फेब्रुवारी 2016 रोजी अहमदनगर येथे डॉ.महाले मंगल कार्यालय, रंगार गल्ली याठिकाणी सकाळी 11 ते 3.00 या वेळेमध्ये भूमीहिन बेघरांचा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यास संस्थापक अध्यक्ष अॅड.भानुदास होले, प्रदेश संघटक पोपटराव बनकर, जिल्हा विजय पाथरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संघटक विजय मिसाळ, जिल्हा महिला संघटक अध्यक्ष प्रमिला जगताप, जिल्हा महिला उपप्रमुख संगीता भिंगारदिवे, शहर प्रमुख मंगल भिंगारदिवे, वंदना भिंगारदिवे इ.सह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील भूमिहीन बेघर लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड.भानुदास होले यंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.










