अहमदनगर या ऐतिहासिक नगरी मधील जनता खाण्यापिण्याबाबतीत फार चोखंदळ आहेतच, त्यात त्यांना सेवा पुरविणारेपण पिछेहाट करत नाहीत. त्याच सिरीयल...
अहमदनगर या ऐतिहासिक नगरी मधील जनता खाण्यापिण्याबाबतीत फार चोखंदळ आहेतच, त्यात त्यांना सेवा पुरविणारेपण पिछेहाट करत नाहीत. त्याच सिरीयलप्रमाणे नव चावंडा स्वीटस् या नवीन दालनाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.
बुरुडगांव रोडवरील इगल प्राईड गॉलमध्ये पहिले दुकान म्हणजे नव चावंडा स्वीटस् या वास्तुचे उद्घाटन आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते व आमदार संग्राम भैय्या जगातप, गणेशजी भोसले नगरसेवक, वैभवजी जगताप, विकास शेठ जगताप, प्रथम महापौर, भगवानजी फुलसौंदर यांच्या उपस्थितीत थाटामाटात झाले.
खास नगरकरांच्या सेवेसाठी किशोरजी उपाध्याय यांचे नव चावंडा केटरर्स गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असून आणखी एक भर टाकावी म्हणून किशोर महाराज यानी या स्वीट्स चे दालन सुरु केले. त्यात त्यांनी ड्रायफ्रुट मिठाई, बासुंदी, रसमलाई, श्रीखंड सर्व प्रकारचे पदार्थ स्वीटस् व नमकीन चांगल्या व उच्च प्रतीचे तयार केले आहे.
त्याचबरोबर संध्याकाळी गृहिणी व किलबीलसाठी चाटचौपाटी काढून दिली आहे. त्यात भेळ पाणीपुरी, बासकेट चाट, अंबला पाणीपुरी, रगडा पॅटीस, कचोरी इ. पदार्थ आहे.










