अहमदनगर : छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच सभासद हिताचा कारभार करण्यात आला आहे. भविष्यातही सभास...
अहमदनगर : छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच सभासद हिताचा कारभार करण्यात आला आहे. भविष्यातही सभासद ग्रामसेवकांना अत्याधुनिक बँकिंग सुविधा देतानाच राज्यात सर्वाधिक लाभांश देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पतसंस्थेचे नूतन तज्ज्ञ संचालक परमेश्वर सुद्रीक यांनी दिली.
शिवाजीराजे पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी सुद्रीक यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात सुद्रीक बोलत होते. तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल सुद्रीक यांचा पतसंस्थेचे चेअरमन किशोर जेजूरकर, व्हा.चेअरमन राजेंद्र बागले, मान द सचिव अर्चना कडू यांनी सत्कार केला.
यावेळी भाऊसाहेब रणशिंग, नवनाथ गोरे, संतोष थिगळे, अमीर शेख, सुरेश मंडलिक, अरूण गाढवे, संजय गिर्हे, रामदास जाधव, दादासाहेब डौले, सुरेश खरड, दादासाहेब शेळके, प्रशांत सातपुते, अमृत शेवाळे, अनिल जगताप, संजय गवळी, जयराम ठुबे, प्रमोद कानडे, सुदाम बनसोडे, सुनिता बर्वे आदी उपस्थित होते.










